Type Here to Get Search Results !

मटका जुगार चालविणाऱ्या एकावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 


दि.२३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स):  मंचर (ता. आंबेगाव) शहर व परिसरात कल्याण मटका जुगार चालविणाऱ्या जहीर नौशद इनामदार (वय २५, रा. समर्थ कॉम्प्लेक्स, मंचर) याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मंचर ते घोडेगाव रस्त्यावर तपनेश्वर मंदिराजवळ एक व्यक्ती कल्याण मटका जुगार चालवत असून, लोकांकडून पैसे घेत आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस नाईक एन. बी. खैरे, योगेश रोडे यांना दोन पंच घेऊन सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले. पोलिस घटनास्थळी गेले. तेथे इनामदार हा कल्याण मटका जुगार चालवत होता. पोलिस आल्याचे पाहून त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या संदर्भात मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी योगेश रोडे यांनी फिर्याद दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.