पुणे, १३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): विनापरवाना वृक्ष तोडल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेने खासदारपुत्र अजिंक्य गोडसे व योगेश ताजनपुरे यांना तब्बल ४ लाख २० हजारांचा दंड ठोठावला आहे. नाशिकरोड पोलिसांच्या मदतीने पालिकेने तोडलेल्या लाकडांचा एक टेम्पो जप्त केला आहे. खासदार पुत्रानेच वृक्षतोड करत कायद्याचे उल्लंघन केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
सात दिवसांच्या आत दंड न भरल्यास महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम १९७५ चे कलम ८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने काढलेल्या नोटिशीतून दिला आहे.
नाशिक महापालिकेचे उपायुक्त दिलीप मेनकर हे
सिन्नर फाटा परिसरात गुरुवारी (दि.९) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास
स्वच्छतेची पाहणी करत होते. यावेळी त्यांना जुना ओढा रोड, खर्जुल मळा
उड्डानणपुलाच्या जागेतील सर्वे १९३/२० येथे झाडे तोडून ती टॅम्पो या वाहनात
टाकलेली दिसली. वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतली आहे का, याची विचारणा
उपायुक्त मेनकर यांनी त्या वाहनधारकाकडे केली. त्या वाहनधारकाने
काही माहिती नसल्याचे सांगितले. पुढे ही झाडे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे
सुपुत्र अजिक्य हेमंत गोडसे, योगेश ताजनपूरे यांच्या सांगण्यावरुन अवैधरित्या
वृक्ष तोडल्याचे समजले.
यानंतर पालिकेने या दोन्हींच्या नावाने नोटीस
काढत ४ लाख २० हजारांचा दंड ठोठावला. प्रारंभी ही नोटीस घेण्यास टाळाटाळ
केल्यानंतर पालिके चे नाशिकरोडचे उद्यान निरीक्षक एजाज शेख, पठाडे यांनी
नाशिकरोड पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी पत्र दिले. तसेच संबंधितांनी दंड भरला
नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes