पुणे, १५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ योजनेतून साकार होणार आहे. अग्निपथमध्ये निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे तिन्ही सशस्त्र दलांत देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कर शारीरिकदृष्ट्या बळकट होणार असून, जवानांचे सरासरी वय ३२ वरून २६ होणार आहे, असा विश्वास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी बुधवारी (ता. १५) व्यक्त केला.
साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांना या योजनेचा लाभ
घेता येणार आहे. भरती होणाऱ्या तरुणांपैकी २५ टक्के तरुणांना चार वर्षांचा सेवा
कालावधी संपल्यानंतर सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच यापुढे लष्कराची भरती
प्रक्रिया आता ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातूनच होणार आहे, वालिया यांनी
सांगितले. ‘अग्निपथ’ योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी
(ता. १४) तिन्ही संरक्षण दलप्रमुखांच्या उपस्थितीत जाहीर केली. या योजनेची सविस्तर
माहिती देण्यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट
जनरल वालिया बोलत होते.
या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व जिल्ह्यांमधून
अग्निविरांची भरती केली जाईल. या तरुण अग्निविरांमुळे लष्करात उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास
निर्माण होणार आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये राष्ट्रवादाचा प्रसार होणार असून, त्यांच्या चार
वर्षांच्या लष्करी सेवेनंतर समाजाला कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. - लेफ्टनंट
जनरल अरविंद वालिया, चीफ ऑफ स्टाफ, लष्कर दक्षिण मुख्यालय
सहा महिन्यांचे प्रशिक्षण- ब्रिगेडियर पंकज नंदा
यांनी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भरती
प्रक्रिया आणि सेवा पॅकेजची माहिती दिली. येत्या ९० दिवसांत अग्निविरांची पहिली तुकडी
लष्करात भरती होईल. त्यानंतर त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी
सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84