पुणे, दि.१८ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आकुर्डी येथे तहसील कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी महापौर अनिता फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, समता परिषद शहराध्यक्ष चंद्रशेखर भुजबळ, महिला अध्यक्षा वंदना जाधव, उपाध्यक्ष पी. के. महाजन, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, सचिव राजेंद्र करपे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेविका भारती फरांदे, राष्ट्रवादी ओबीसी महिला अध्यक्ष सारिका पवार, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, ॲड. सचिन आवटी, वैजनाथ शिरसाट, अशोक मगर, विद्याताई शिंदे, बारा बलुतेदार संघाचे विशाल जाधव, शंकर लोंढे आदी उपस्थित होते.
निदर्शनानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदार प्रवीण ढमाले
यांना निवेदन दिले.- या निवेदनात पुढे म्हटले आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
राज्य सरकारने बाठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग नेमला आहे. सदर आयोगाने
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आडनावाच्या आधारे एम्पिरिकल टाटा सदोष पद्धतीने संकलित
केला आहे. यामुळे ओबीसी समाजाची सामाजिक,
राजकीय, आर्थिक
परिस्थिती संकलित केली जात नाही. ही सर्व ओबीसी समाजाची फसवणूक आहे. ही चुकीची
पद्धत सरकारने हस्तक्षेप करून ताबडतोब थांबवावी आणि सर्वोच्च न्यायालयात टिकेल अशा
पद्धतीनेच सर्वसमावेशक ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डाटा गोळा करावा. तसेच अनेक
वर्षापासूनची ओबीसी समाजाची जनगणनेची मागणी मान्य करावी. अन्यथा अखिल भारतीय
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल
असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes