पुणे, १६ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): भारतीय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व१४ जूनच्या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य
साधून महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषद
यांच्या माध्यमातून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी ३ ते ६ या वेळेत
राज्यभरातील सातत्यपूर्ण रक्तदान करणारे शतकवीर रक्तदाते, नियमित शिबिर संयोजक संस्था, गणेश उत्सव मंडळे व कंपनी त्याचप्रमाणे प्रभावी काम
करणाऱ्या रक्त केंद्रांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमास
मा.आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध
प्रसाधन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री
राजेंद्रजी पाटील येडगावकर, आरोग्य विभाग
सचिव प्रदीप व्यास, अरुण थोरात,
रामास्वामीजी, आदींची मुख्य उपस्थिती होती.
स्वेच्छा रक्तदान
संकलनात महाराष्ट्र सातत्याने क्रमांक १ राहत असल्याने सर्व मान्यवरांनी
महाराष्ट्रातील सर्व रक्तदाते शिबिर, संयोजक व रक्त केंद्रांचे भरभरून कौतुक केले.हे कार्य असेच पुढे चालू राहून
रक्ताविना कोणीही मृत्युमुखी पडणार नाही अशी रचना आपण लावावी असे आवाहन माननीय
मंत्र्यांनी केली.रक्तासोबत रक्त गुणवत्ता व रक्तघटक याचा प्रभावीपणे उपयोग करावा
असे सुचविले गेले.
९० हून अधिक व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला- महाराष्ट्रात शासकीय ७६ व अन्य ३०० मिळून ३७६ रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत पैकी ६ शासकीय व ६ अशासकीय अशा १२ रक्तपेढ्यांचा सन्मान करण्यात आला. कोविडसारख्या कठीण काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करून रुग्णांची उत्तम सेवा केल्याबद्दल जनकल्याण रक्त केंद्र पुण्याचा सन्मान करण्यात आला.स्वेच्छा रक्तदान चळवळीत ही रक्तपेढी अग्रेसर राहिली आहे.सुरवातीपासूनच स्वेच्छा रक्तदान,पैश्याच्या मोबदल्यात रक्तदान किंवा तत्सम कुठल्याही तडजोडी न करता जनकल्याण रक्तपेढी कासम करीत आहे.सदर सत्कार जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने रक्तकेंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश कांबळे, सेवावृत्ती रवी कुलकर्णी व स्वेच्छा रक्तदान विभाग व्यवस्थापक संतोष अनगोळकर यांनी स्वीकारला.
सदर सन्मान
जनकल्याण रक्तपेढीचे आत्मीय नियमित रक्तदाते, शिबिर संयोजक, हितचिंतक,माननीय विश्वस्त
मंडळ व रक्तपेढीचे कर्मचारी,अधिकारी व डॉकटर
या सर्वांच्या अपार मेहनतीमुळे व सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच मिळालेला आहे.त्यामुळे
जनकल्याण रक्त केंद्र पुणे सदर सन्मान आत्मीय रक्तदाते,शिबिर संयोजक,हितचिंतक व देणगीदार यांना समर्पित
करीत आहे असे जनकल्याण रक्त
केंद्र चे कार्यकारी संचालक डॉ अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84