Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ‘हे’ आमदार असण्याची शक्यता; तर रायगड शिवसेनेच्या हातून जाईल का?



दि.२जून २०२२ (चेकमेट टाईम्स):  शिवसेनेतून एक मोठा नेता आपल्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन बाहेर पडणार अशी सकाळपासून चर्चा आहेच. एकनाथ शिंदे हे व्यक्तिमत्व शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नंतर असणारे महत्त्वाचे नेतृत्व आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल का उचलले असावे? किंवा केवळ आपली ताकद आणि महत्त्व दाखवण्यासाठी हा प्रकार आहे का? हा वेगळा चर्चेचा विषय ठरेल. परंतु, ते जर बाहेर पडलेच; तर त्यांच्या सोबत कोणते महत्त्वाचे आमदार असतील हे पाहू. शिवाय रायगड हातून जाणार का? हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग.

सध्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, उदयसिंग राजपूत, भरत गोगावले, नितीन देशमुख, अनिल बाबर, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, महेश शिंदे, शहाजी पाटील, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, श्रीनिवास वनगा, राजकुमार पटेल, अपक्ष प्रदीप जयस्वाल, महेंद्र दळवी, सुहास कांदे, बालाजी किणीकर हे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई आणि ठाणेनंतर शिवसेनेची मजबूत पकड असणारा रायगड जिल्हा. या जिल्ह्यातून महाविकास आघाडीनंतर बऱ्याचदा तेथील आमदारांची राष्ट्रवादीच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात नाराजी समोर आली होती. परंतु, त्यावर कोणतीही क्रिया शिवसेनेकडून अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून न झाल्याने महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे नाराज होते. रायगडमध्ये शिवसेनेचा पालकमंत्री असावा अशी त्यांची मागणी नेहमी दुर्लक्षित राहिल्याने आज हे तिन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची दाट शक्यता आहे. यामुळेच अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजनाला हे तिन्ही नेते गैरहजर होते. रायगडमध्ये शिवसेनेची पकड मजबूत राखून ठेवलेले भरत गोगावले जर बाहेर पडले, तर शिवसेनेचे कोकणातले अस्तित्व निघून जाण्याची दाट शक्यता आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.