दि.२४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी
गुरुवारी (२३ जून) प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर
(https://www.pmc.gov.in) तसेच प्रभागाची यादी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात पाहण्यासाठी
उपलब्ध राहणार आहे. महापालिकेच्या नियोजित ५८ प्रभागनिहाय प्रसिद्ध यादीत, नागरिकांनी त्यांचे नाव त्या-त्या
प्रभागाच्या मतदार यादीतच असल्याची खात्री करावी, असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागाने केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि.
३१ मे २०२२ रोजीची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची विभागणी करून
प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात नवीन नावांचा समावेश
करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली
जात नाहीत. त्यामुळे दि. ३१ मे रोजीच्या विधानसभा मतदारयादीत ज्यांची नावे आहेत, अशा मतदारांनाच महापालिका निवडणुकीत
मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
-सदर प्रारूप मतदार यादीवर १ जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. या हरकती/सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे अथवा मुख्य निवडणूक कार्यालय, सावरकर भवन, शिवाजीनगर येथे दाखल करता येणार आहेत.
-हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84