पुणे, दि.७ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): काही टीव्ही चॅनल्स वर टायटन रागा ह्या घड्याळाची जाहिरात प्रसारित होत आहे. सदर जाहिरातीत एका विवाह सोहोळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असून सर्वजण नियोजित वधू सोबत लग्नाच्या विविध समारंभात ती काय घालणार यावर चर्चा करत आहेत. या जाहिरातीत दाखवण्यात आलेली अश्लीलता पाहता समाज मनावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचा दावा करत, त्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदिप खर्डेकर यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या जाहिरातीत नियोजित वधू आपल्या बॅचलर पार्टीचा ड्रेस व घड्याळ, कॉकटेल पार्टीचा ड्रेस व घड्याळ, लग्नाच्या दिवशीचे ड्रेस दाखवत आहे. यावेळी तिची मावशी तिला विचारते की “हनिमून” ला काय घालणार आहेस ? यावर एक क्षण थांबून नियोजित वधू थांबून म्हणते - मावशी "हनिमून ला कोणी कपडे घालते का ?"
(सदरील जाहिरात आपल्याला या बातमीच्या शेवटी पाहण्यास उपलब्ध आहे.)
या जाहिरातीवर
व्यक्त करताना संदीप खर्डेकर म्हणतात, ‘माझ्या मते कोणत्याही
भारतीय कुटुंबात नियोजित वधू अश्या प्रकारचे वक्तव्य करणार नाही.’ कदाचित काही पुरोगामी मंडळींना यात काही वावगे वाटणार नाही किंवा अभिव्यक्ती
स्वातंत्र्य म्हणून ही याकडे पहिले जाईल, मात्र माझ्या मते याला
बंधन घालणे गरजेचे असून योग्य कारवाई व्हावी अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
त्याचबरोबर इतरही जाहिरातींमध्ये स्त्री देहाचे प्रदर्शन केले जाते, याबाबत ही आचारसंहिता तयार केली जावी अशी ही मागणी केली आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84