पुणे, दि.७ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे मनपा प्रशासनाच्या ढिसाळ आणि ठेकेदारप्रेमी कारभारामुळे शहरात सर्वच भागात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. विशेषतः शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार या भागातील अरुंद रस्त्यांवर खोदकामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मलनिस्सारण, समान पाणीपुरवठा यामुळे सुरू असलेल्या रस्त्यांचे खोदकाम १५ मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु जून अखेर पर्यंत देखील ही कामे पूर्ण होतील का याबद्दल शंका आहे. आम आदमी पक्षाची मागणी आहे की, प्रशासन आणि ठेकेदारांना या दिरंगाईबद्दल जबाबदार ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कामांच्या दरम्यान जर काही जीवितहानी झाली तर त्यासाठी सर्वस्वी पालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार धरण्यात यावेत.
"वर्षातील १२ ही
महिने पुणे शहरात सातत्याने रस्त्यांची कामे सुरूच असतात, कधीही न संपणाऱ्या या रस्ते खोदकामांमुळे पुणेकर अक्षरशः
मेटाकुटीला आले आहेत. जर यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्यास
आम आदमी पक्ष संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होणार
नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.", विजय कुंभार, आप राज्य संघटक
तथा पुणे शहर कार्याध्यक्ष.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84