दि.२३ जून
२०२२ (चेकमेट टाईम्स): श्री
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथे शुक्रवारी (दि. 24) मुक्कामी येणार
आहे. शुक्रवार आणि शनिवारी (दि. 25) मुक्काम करून हा सोहळा रविवारी (दि. 26)
पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्याच्या काळात नगरपालिकेची आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत सुविधा व स्वच्छतेची तयारी
पूर्ण झाली आहे, असे
सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले. सासवड नगरपालिकेने पालखी काळात
सासवड शहर आणि परिसरात कचरा संकलनासाठी 20 वाहने व 150 कर्मचारी नेमले आहेत.
पालखीतळाची स्वच्छता, खांबावरील
विजेचे दिवे, पालखी
तंबूजवळ लाईटची व्यवस्था जनरेटरसह केली आहे.
हाय मास्टची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसविण्यात
आले आहेत. भाविकांना दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावण्याची
व्यवस्था केली आहे. पालखीतळावर महिलांसाठी व पुरुषांसाठी एकूण 32 सीट्स शौचालय व
16 सीट्स स्नानगृहे बांधण्यात आली आहेत. तसेच, ते अपुरे पडत असल्याने पालखीतळाशेजारील जागेत
तात्पुरत्या स्वरूपाचे फायबरचे महिला व पुरुषांसाठी 150 सीट्स शौचालयांची उभारणी
करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात स्नानगृहाची उभारणी, त्यासाठी लागणारे पाण्याचे कनेक्शन
घेण्यात आले आहे. पुणे व सातारा जिल्हा महावितरण कार्यालय यांना विद्युत पुरवठा
अखंडितपणे राहण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
पालखीतळ परिसरात 10 ठिकाणी तात्पुरती
10 कोंडाळी व पाण्याचे टँकर भरून देण्याची व्यवस्था पाणीपुरवठा केंद्र, हिवरे रोड, वीर रोड, वढणे वस्ती व बोरावके मळा येथे करण्यात आली आहे.
तसेच टँकरमध्ये व सासवडच्या आसपास असलेल्या विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची
व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या
काळात संपूर्ण सासवड शहरात सकाळी व संध्याकाळी ज्यादा पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था
करण्यात आली आहे. सासवड नगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका व
कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन
चव्हाण यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची
पालखीमधील पादुकांची महापूजा माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते दोन वेळा करण्यात
येणार आहे. तसेच, संत
सोपानदेव महाराज व संत चांगावटेश्वर पालखीचे सासवड येथून प्रस्थान होते. पालखीतळ, पाणीपुरवठा केंद्र व नगरपालिका
कार्यालय याठिकाणी नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे. नगरपालिकेच्या वतीने दिवे
नाका येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते. त्यासाठी मांडव व स्पिकर व्यवस्था, तसेच पालखीला निरोप देण्यासाठी जेजुरी
नाका येथे मंडप व स्पिकरची व्यवस्था केली आहे, असे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.
वरील वृत्त
खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84