पुणे, दि.१८ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): मध्यवर्त भागात आधीच वाहतुकीचा बोजवारा उठला असताना फडके हौद चौक ते सोन्या मारुती चौक या टप्प्यामध्ये अनेक वाहनचालक हे नो एन्ट्री असताना, फडके हौद चौकातून सोन्या मारुती चौकातून उलट्या दिशेने बिनधास्त जात असतात, पर्यायी रस्ता उपलब्ध असून, हे वाहनचालक फडके हौद चौक येथून, सोन्या मारुती चौकाकडे बेशिस्तपणे गाडी चालवत जातात या मध्ये दुचाकी, रिक्षा, आणि चार चाकी गाड्यांचा समावेश आहे हे एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.
फडके हौद चौक हा वर्दळीचा चौक असून इथे अनेकवेळा वाहतूक
कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते, त्यात सणासुदीला तर विचारायची सोया नाही. हा वाहतूक शाखेचा एक मुख्य पॉईंट असून इथे अनेक वेळा
कर्मचारीच उपलब्ध नसतो, बरं जो असतो तो कोपऱ्यात उभा राहून नागरिकांची गम्मत बघतो
की काय असा संशय उत्पन्न होतो.
ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे
पुणे शहर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी फरासखाना वाहतूक
विभागाला आज पत्राद्वारे बेशिस्त वाहनचालकांना रोखा अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जा, असा इशारा
दिला आहे . वाहतूक पोलीस याबाबत कारवाई करतात का
हे बघावे लागेल.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes