Type Here to Get Search Results !

पुण्यात उपहारागृहात तोडफोड करत टोळक्याची दहशत; खुर्ची न दिल्याने चौघांना मारहाण



दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): उपहारागृहात साथीदारांसह आलेल्या सराइत गुंडाला बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्याने दहशत माजविल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. तसेच, टोळक्याने एकावर शस्त्राने वार केले तसेच परिसरातील मद्यालय आणि एका दुकानावर दगडफेक करून टोळक्याने दहशत माजविली.

या प्रकरणी सराइत गुंड रुपेश घोरे, शुभम नाईक, अंक्या भोसले, अर्जुन उर्फ भावड्या जगताप, गणेश इंगळे, सोमा यांच्यासह साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लक्ष्मण मसय्या बंगारी (वय २३, रा. सिद्धार्थनगर, बिबवेवाडी) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत बंगारी, त्याचे मित्र राहुल खरात, मयूर भडाव्वे, गौस शेख जखमी झाले आहेत.

आरोपी घोरे सराइत गुंड आहे. तो आणि त्याचे साथीदार कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सरपंच हॉटेलमध्ये रात्री आले होते. त्या वेळी बंगारी, खरात, भडाव्वे चहा पित होते. आरोपी घोरेने बसण्यास खुर्ची देण्यास बंगारीला सांगितले. बंगारीने नकार दिल्यानंतर घोरे आणि साथीदार चिडले. त्यांनी आरडाओरडा करुन दहशत माजविली. आम्ही या परिसरातील भाई आहोत. आमच्या नादी लागू नका, असे सांगून टोळक्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बंगारी, खरात, भडाव्वे, शेख यांना शिवीगाळ केली. टोळक्याने कोयत्याने शेख याच्यावर वार केला.

बंगारीला दांडक्याने मारहाण करुन त्याच्यावर हातावर वार केला. खरात आणि भडाव्वे यांना मारहाण करुन दुचाकीची तोडफोड केली. सरपंच हॉटेल, एअरकिंग परमिट रुम तसेच एका दुकानावर दगडफेक करून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.