दि.30 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): महाराष्ट्रातील
संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या
नामांतराने या भागातील ऐतिहासिक वारशाच्या सन्मानासोबतच राष्ट्रीयतेचाही
सन्मान झाल्याची भावना आज ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाने
शिवसेनेच्या 'प्राण
जाये पर वचन न जाये' या
वाक्याला मुख्यमंत्री जागले आहेत, असे
प्रतिपादन त्यांनी केले आहे.
याबद्दल
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानून
अभिनंदन केले आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम आणि मराठवाडा विभागातील जुलमी राजवट
असलेला इतिहास लक्षात घेता या भागातील राष्ट्रप्रेमी नागरिकांची जुलमी इतिहासाची
आठवण करून देणारी नावे बदलण्याची मनोमन असलेली इच्छा आज महविकास आघाडीच्या सरकारने
राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील औरंगाबाद
आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेऊन आज पूर्ण केली
आहे.
महाराष्ट्राच्या
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मराठवाड्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अनेक
वर्षांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य
सरकारने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही शहरांच्या नामांतराचा क्रांतिकारी
निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84