Type Here to Get Search Results !

सोशल मिडीयावरील अश्लील कॉमेंट्सपासून महिला आयोगाच्या अध्यक्षांचीही सुट्टी नाही; एकजण गजाआड

 

पुणे जून २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे: महिलांवरील अत्याचार, अन्याय याविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोग कार्यरत असतो. पण याच महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच काही विकृत मंडळींचा सामना करावा लागत असेल तर? आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना असाच अनुभव त्यांनी वटपौर्णिमेबाबत केलेल्या पोस्टवर आला.

चाकणकर यांनी मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यावरून अनेकांनी खालच्या भाषेत कॉमेंट केल्या. अशा कॉमेंटवर कारवाई होऊ शकते. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद संवैधानिक आहे आणि अशा प्रकारांची ते दखल घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू शकतात, हे माहीत असतानाही अशा मंडळींनी सोशल मिडियावर नको त्या कॉमेंट केल्या.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात चाकणकर यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त मी स्वतः जात नाही, हे सांगितले. त्याच वेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली. सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली. यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे, असा अभिप्राय कुलकर्णी यांनी नोंदवला आहे.

त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली. मला ते टाकताना लाज वाटते आहे पण अतिशय अश्लील भाषेत अनेक कॉमेंट आहेत. विशेष म्हणजे रूपाली चाकणकर यांचे घटनात्मक पद व तात्काळ कारवाईच्या शिफारस करू शकणारे पद असल्याने त्या सर्व विकृत व्यक्तींवर लगेच कारवाई होऊ शकते हे माहीत असूनही अशा कॉमेंट करण्याची हिंमत केली याचा अर्थ सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे त्याचे उदाहरण आहे. सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी करणार आहे.

त्याचबरोबर सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा कॉमेंट केल्या तर स्वतःहून कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पुरुष म्हणून मी मागील वर्षी वटसावित्रीवर टीका केली तर मला फक्त पुरोगामी म्हणून शिव्या दिल्या पण एक स्त्री टीका करते तेव्हा थेट अश्लील शेरेबाजी होते ही विकृती रोखायला हवी, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी मांडली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.......!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.