पुणे, दि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): देशात
जातीव्यवस्थेमुळे होणारे अत्याचार आणि अन्याय अजुनही कमी झाल्याचं दिसत नाही.
अशातच लखनौच्या आशियाना परिसरात एक लाजीर्वाणी घटना घडली आहे. फूड डिलिव्हरी बॉयची
जात विचारुन त्याच्याकडून जेवण घेण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसंच
डिलिव्हरी बॉयने जाब विचारल्यावर सदरील व्यक्तीनं थेट त्याच्या तोंडावर तंबाखू
थुंकल्याचं समोर आलं आहे. तसंच नंतर धावत जाऊन मारहाण केली, त्याची दुचाकी देखील आपल्या
ताब्यात घेतली. डिलिव्हरी बॉय हा सर्व प्रकार झाल्यानंतर तिथून पळून गेला.
त्यानंतर त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून
डिलिव्हरी बॉयची दुचाकी ताब्यात घेतली. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी एससी-एसटी
कायद्यांतर्गत 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला
आहे.
किला मोहम्मदी
भागात राहणारे विनीत कुमार रावत हे फूड डिलिव्हरीचं काम करतो. शनिवारी रात्री
उशिरा तो सेक्टर-एच येथून अजय सिंगच्या नावाने डिलिव्हरी ऑर्डर घेऊन गेला होता.
विनीतच्या म्हणण्यानुसार, तो ऑर्डर घेऊन
येताच एक व्यक्ती घरातून बाहेर आली. त्याने नाव विचारलं. नाव सांगताच त्यांनी
ऑर्डर घेण्यास नकार देत दलितांच्या हातून अन्नपदार्थ घेणार नसल्याचं सांगितलं.
यावर डिलिव्हरी बॉयने त्याला ऑर्डर रद्द करण्यास सांगितलं. याचा राग आल्यानंतर
त्या व्यक्तीने विनीत कुमारच्या अंगावर तंबाखू थुंकली. विरोध केल्यावर आरोपीने
शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याचे अनेक साथीदार लाठ्या-काठ्या
घेऊन आले आणि विनीत यांना मारण्याचा प्रयत्न झाला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84