पुणे, दि. ११ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 68 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
सिंहगड रोड पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार शुभम सचिन ऊफाळे (वय – 21 रा. हिंगने
खुर्द, साई नगर, पुणे) असे
स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शुभम ऊफाळे याला
एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शुभम ऊफाळे हा
अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस
स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, चाकु, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह फिरत असताना
खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, दरोड्याचा
प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले
आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 03 गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला
प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुभम
ऊफाळे याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई
करण्याचे आदेश दिले.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes