दि.२4 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): पुण्यातील
प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची
चौथऱ्यासह 35 फूट उंच मूर्ती सिंहगड रोड येथील स्टुडिओत साकारली.
सिव्हीइलेक प्रोजेक्ट सोल्युशन या कंपनीकडून ही मूर्ती तयार करण्याची मागणी
करण्यात आली असून ती सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या
दिवशी ती बसविण्यात येणार आहे.
मागील दोन महिन्यापासून मूर्ती शिल्पकार विनोद येलारपूरकर ही मूर्ती साकारात असून त्याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार मदत करत आहे. सिव्हिइलेक प्रोजेक्ट कंपनीचे संचालक दत्तात्रय आत्माराम भालेगरे व कमलेश आत्माराम भालेगरे यांनी ही मूर्ती तयार करण्याची कल्पना शिल्पकार येलारपूरकर यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार सदर सुबक मूर्ती बनविण्यात आली आहे. ही मूर्ती बनविण्याकरिता 40 किलो वजनाची 200 मातीची पोती लागली. तर, दीड हजार किलो वजनाचे लोखंडी सांगाडा व फायबर वापरण्यात आले. दहा फुटी चौथ्यावर मूर्ती स्थापित केल्यानंतर बाजूला पेटी, तबला, वीणा, डगा ही वारकऱ्यांची वाद्य ही लावण्यात येणार आहे.
मूर्तीच्या
उजव्या हातात कमल पुष्प आणि डाव्या हातात शंख अशा स्वरुपात विष्णु रुपात ही मूर्ती
साकारण्यात आली आहे. पंढरपूर येथील मूर्तीच्या हातात ही अशाचप्रकारे पुष्प व शंख
आहे. पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल मंदिराचे डिझाईनचे काम ज्यांनी केले ते सोलापूरचे
आर्टिस्ट किरण सगर यांनी मूर्तीवरील दागिन्यांचे काम केले आहे. काळया पाषणासारखे
रुप या मूर्तीला देण्यात आल्याने ते विलोभनीय दिसत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84