दि.२४ जून २०२२
(चेकमेट टाईम्स ): कात्रज जुन्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ
शिंदेवाडीच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरडीचा काही भाग
कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा नुकसान झाले नाही. मात्र
यानिमित्ताने कात्रज जुन्या बोगद्यावरील धोकादायक दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कात्रज जुन्या बोगद्याच्या शिंदेवाडी
गावच्या बाजूकडील प्रवेशद्वाराच्या तोंडाशी ही दरड कोसळली. पुण्याच्या दिशेने
निघालेला टेम्पो आणि एक दुचाकी या दोन वाहनांच्या मध्यभागी या दरडीचा काही भाग
कोसळला. एक टेम्पो आणि एक दुचाकी पुण्याकडे निघाली होती.
हा टेम्पो आणि दुचाकी या दोन वाहनांच्या मध्ये दरडीचा काही भाग
कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही किंवा नुकसान झाले नाही. रस्त्याच्या
एका कडेला दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला नाही. वनविभाग आणि सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. मात्र यानिमित्ताने
कात्रज जुन्या बोगद्यावरील आणि कात्रज घाटातील दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भविष्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम
विभाग आणि वन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक
ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84