Type Here to Get Search Results !

योग योगेश्वर जय शंकर मालिकेचे टायटल ट्रॅक व्हायरल, प्रेक्षकांची मिळतेय पसंती

 


पुणे जून २०२२ (चेकमेट टाईम्स): अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे 'कुणाल भगत' आणि करण सावंत'. त्याच बरोबर संगीत विश्वात आपल्या सुमधूर आवाजाचा ठसा उमटवणारी ट्रेंडींग गायिका म्हणून 'सोनाली सोनावणे' प्रसिद्ध आहे. यांनी नुकतंच 'योग योगेश्वर जय शंकर' या मालिकेचं टायटल ट्रॅक केलं आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे तर कुणाल करण यांनी हे गाणं लिहीले असून संगितबद्ध ही त्यांनीच केले आहे. शिवाय या टायटल ट्रॅकचं रेकॉर्डींग कुणाल - करणच्या नवी मुंबई येथील एलीक्झर स्टुडीओमध्ये करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या टायटल ट्रॅकची तुफान चर्चा आहे.

sa

संगीतकार कुणाल - करण मालिकेच्या टायटल ट्रॅक विषयी सांगतात, "या आधी आम्ही 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, बॅंड बाजा वरात, महामिनिस्टर या मालिकेंचे टायटल ट्रॅक केले आहे. गायक रविंद्र खोमणे यांचा रांगडा आवाज आणि गायिका सोनाली सोनावणे हीचा मधाळ आवााज यांची सांगड या नव्या टायटल ट्रॅकमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आम्ही याआधी एकत्र काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणात हे टायटल ट्रॅक रेकॉर्ड करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. या गाण्याविषयी सांगायचं झालं तर या गीताचे शब्द संगितबद्ध करताना त्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. मनात एक वेगळाच भाव होता. आणि हे प्रत्यक्षात उतरण्यामागेही ईश्वराचे आशीर्वाद आहे. 'योग योगेश्वर जय शंकर' या अध्यात्मिक मालिकेचं टायटल ट्रॅक करण्याची संधी कलर्स मराठीने आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो."

गायिका सोनाली सोनावणे टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा शेअर करताना सांगते, "अनेक अल्बमची गाणी मी याआधी गायली आहेत. परंतु ब-याच दिवसांपासून माझी इच्छा होती की एखाद्या मालिकेचं टायटल ट्रॅक मला गायला मिळावं. आणि ती इच्छा योग योगेश्वर शिव शंकर या मालिकेमुळे पूर्ण झाली. त्यासाठी मी कुणाल - करण आणि कलर्स मराठीचे आभार मानते. मी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवतानाच मला अनेक भावगीतं गायला मिळाली. आणि आता मालिकाविश्वात प्रवास सुरू करताना मला सुंदर असं अध्यात्मिक टायटल ट्रॅक गायला मिळणं. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. असचं प्रेम कायम असू द्या. हीच सदिच्छा!!"

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.......!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.