दि.२३ जून
२०२२ (चेकमेट टाईम्स): घरफोडीतील गुन्हेगार प्रविण राजा शिंदे (रा. वडुज, ता. कराड) हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन
सोलापुरात आल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा रचून
मोठ्या शिताफीने पकडले. क्रेझ म्हणून प्रविण शिंदेकडून पिस्तूल विकत घेणाऱ्यांना
तिघांनाही पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ते चौघेही सध्या पोलिस
कोठडीत आहेत.
प्रविण शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर अनेक घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरी, घरफोडी करतानाच त्याने देशी बनावटी पिस्तूल स्वस्तात विकत घेऊन ज्यादा पैशाने विकायचा अवैध व्यवसाय सुरु केला होता. मध्यप्रदेशातून २० ते २५ हजार रुपयाला पिस्तूल विकत घेऊन तो सातारा जिल्ह्यातच विक्री करीत होता. दरम्यान, प्रविण शिंदे हा १२ जून रोजी सोलापुरातील एका तरूणाला पिस्तूल विकायला येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस प्रशालेसमोर सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे प्रविण शिंदे हा दुचाकीवरून (एमएच ११, सीआर ५२०९) त्याठिकाणी आला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले आणि अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस (गोळ्या) आढळली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या माध्यमातून पोलिस कोठडी मिळवली. त्यानंतर अधिक तपास केला आणि आतापर्यंत तिघांना अशाप्रकारची तीन पिस्तूल विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार राकेश पाटील, पोलिस नाईक चेतन रूपनर, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, अय्याज बागलकोटे, पोलिस शिपाई अश्रुभान दुधाळ, अमोल यादव, किशोर व्हनगुंटी, सचिनकुमार जाधव, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, शंकर याळगी, इकरार जमादार यांच्या पथकाने त्या तिघांचा शोध घेतला.
घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी
पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक साताऱ्याला रवाना झाले. या पथकाने पोलिस आयुक्त
राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या
मार्गदर्शनाखाली संशयित आरोपींचा शोध घेतला. त्यांनी स्वरूप विजय पाटील (रा.
तांबवे, ता. कराड), अमोल उर्फ पप्पू विलास खरात (रा. दहिवटी, ता. माण) आणि ओंकार उर्फ रावडी जालींदर देशमुख
(रा. सातारा) यांना पकडले. या गुन्ह्यात पाच पिस्तूल आणि दहा जिवंत काडतूस जप्त
केले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे कौतुक केले.
वरील वृत्त
खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84