दि.२१ जून २०२२
(चेकमेट टाईम्स): पोलिसांत नोकरी
लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक (करण्यात आली आहे.
पुण्यात हा प्रकार घडला आहे. यासंबंधी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल
केला आहे. तसेच आरोपीच्या मुसक्याही आवळल्या आहेत. शहर पोलीस दलात अनुकंपा
तत्त्वावर नोकरी लावून देतो, असे आमिष एका
तोतया पोलिसाने अनेक तरुणांना दाखवले आणि फसवणूक केली आहे. या तरुणांकडून पैसे
उकळून हा तोतया पोलीस पसार झाला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात या
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिन्मय मोहन देवकाते (रा. माढा, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे
नाव आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. कर्वेनगर येथील विकी अनिलराव मुळे (वय 26, रा. होम कॉलनी, हिंगणे, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार 23
एप्रिल ते 28 मे यादरम्यान हिंगणे, कर्वेनगर या
परिसरात घडला आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, विकी अनिलराव मुळे तरूण
त्याच्या तीन मित्रांसह हिंगणे होम कॉलनी येथे राहतो. चिन्मय देवकाते त्याच्याशी
त्याची ओळख झाली. त्यावेळी चिन्मय देवकातेने आपण पोलीस असल्याची बतावणी केली.
त्यानंतर तो त्यांच्या रूममध्ये राहण्यासदेखील आला. तो त्यांच्यासमोर नेहमी
पोलिसांच्या गणवेशात फिरत होता. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले चांगले
संबंध असल्याचे तो त्यांना सांगत असे. त्याचबरोबर असे बोलून तो रूममधील सहकाऱ्यांचा
विश्वास संपादन करू लागला. वरिष्ठांशी चांगले संबंध असून त्यांना पैसे देऊन आपण
अनुकंपातत्वावर नोकरीला लावून देतो, असे त्याने
फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना सांगितले. विशेष म्हणजे त्यांनीदेखील आरोपीवर
विश्वास ठेवला.
नोकरी मिळेल, या आशेने पाच जणांनी त्यास एक लाख रुपयांहून
अधिक रक्कम दिली. त्यानंतर त्यांनी बरेच दिवस त्याच्याकडे विचारणादेखील केली, मात्र तो त्यांना टाळायला लागला होता.
यासर्वांच्या मनात त्याच्याविषयी संशय निर्माण होऊ लागला. चिन्मय देवकाते याच्याही
हे लक्षात येवू लागले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र बाहेर गेल्यानंतर तो
त्यांचे मोबाईल, लॅपटॉप घेऊन पसार झाला.
याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचा पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात
आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84