पुणे, १३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): ' विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद-भ्रम अमंगळ ' संत तुकारामांच्या अभंगातील या ओळींचा
समावेश असलेली आगळीवेगळी पगडी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठी सज्ज
झाली आहे.
पुण्याच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये पासोड्या विठोबा परिसरात असलेले मुरुडकर झेंडेवाले यांचे दुकान सार्वजनिक कामात वावरणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे.गिरीश मुरुडकर इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमाधारक असून,देश-विदेशात करियरच्या संधी असून,इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये दुकानाची जागा असून देखील घरच्या पारंपरिक व्यवसायात रमले.आता हा व्यवसाय चौथ्या पिढीकडे जाईल.मुरुडकरांच्या चार पिढ्या या कला व्यवसायात रमल्या आहेत. बारशापासून,गणेशोत्सव,सभा-संमेलने,मोर्चे,आंदोलने,निवडणूक अशासाठी बारा महिने मुरुडकर झेंडेवाले कलात्मक गोष्टी घेऊन उपलब्ध असतात.
राजीव गांधी,अटलजी,सचिन तेंडुलकर,अमिताभ बच्चन यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मान्यवरांकरीता फेटा,पगडी करण्याचा बहुमान मुरुडकर झेंडेवाले यांना मिळाला आहे. गणेशोत्सव,धार्मिक उत्सवासाठी येथील कलावस्तू अगदी परदेशात देखील जातात,असे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले.
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84