दि.२५ जून २०२२ (चेकमेट
टाईम्स ): 2019 साली
दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली होती.
यात घर, गाडी, मालमत्ता, सोनं, गुंतवणूक, कर्जासह इतर
माहिती जाहीर केली होती. 2019 साली महाविकास आघाडी सरकार उदयास आलं. या सरकारमध्ये
एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं दिलं गेलं. गेल्या अडीच वर्षातील एकनाथ शिंदे
यांच्या संपत्तीत नेमकी किती वाढ झाली, हे कळू शकलेलं नाही.
मात्र, 2019 पर्यंत नेमकी त्यांची संपत्ती किती होती,
याची आकडेवारी समोर आली आहे. खरंतर एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
हा मोठा संघर्षाचा होता. रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक असा हा प्रवास झालाय.
आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मालमत्तेबाबतची
महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे
किती गाड्या? - 2019 मध्ये एकनाथ शिदे यांच्याकडे
एकूण सात गाड्या होत्या. या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत 46 लाख रुपये इतकी होती.
यामध्ये स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, अरमाडा,
टेम्पो या गाड्यांचा समावेश होते. प्रत्येकी दोन स्कॉर्पिओ आणि
इनोव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे होत्या. तर प्रत्येकी एक बोलेरो, आरमाडा आणि टेम्पोचाही यात समावेश आहे.
शिंदेंकडे
सोनं किती? - एकनाथ
शिंदे यांच्याकडे 110 ग्रॅम सोन स्वतःकडे आहे. तर 580 ग्रॅम सोन बायकोकडे असल्याची
माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलो होती. एकूण 25 लाख रुपयांपेक्षा जास्त सोनं एकनाथ
शिंदे यांच्याकडे 2019 साली होती. तशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली होती.
पिस्तूलही
आहे आणि रिव्हॉल्वरही - एकनाथ शिंदे यांच्या कडे एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही
असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
जमीन
कुठं कुठं घेऊन ठेवलीये? - एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28 लाख रुपयांची शेतजमीन
आहे. हे जमीनमूल्य 2019 च्या बाजारभावाप्रमाणे लावण्यात आलं आहे. त्यात सातत्यानं
वाढ होत असते. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या 12 एकर जमीन आहे. तर चिखलगाव,
ठाण्यात पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी
प्रतिज्ञापत्रातून दिली होती.
घरं
किती? - वागळे
इस्टेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावे 30 लाखांचा एक दुकानाचा गाळा आहे.
तर ठाणे पश्चिमेच्या वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घर आहे. हे घर 360 स्केअर
फिट आहे. तर लँडमार्क को ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या
फ्लॅटचं क्षेत्रफळ 2370 स्केअर फिट आहे. दरम्यान, एकनाथ
शिंदे यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती
भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली होती.
घरं आणि गाळ्याांचा आताच्या घडीचं मूल्य पाहिलं तर ते 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त
असल्याचं सांगितलं जातं. 2019 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे
यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचं कर्ज होतं. यात TJSB चं
दोन कोटी 61 लाखांचं गृहकर्ज असणार आहे. यात श्रीमान रिएलिटीच्या 98 लाखांच्या
कर्जाचाही समावेश आहे.
गेल्या
3 वर्षांत किती संपत्ती वाढली? - 2019-2022 या काळात एकनाथ शिंदे यांची संपत्ती नेमकी किती वाढली,
हे कळू शकलेलं नाही. सध्या एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह
गुवाहाटीमध्ये आहेत. महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची मागणी त्यांनी केलीय.
सध्या आपल्या 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावादेखील एकनाथ शिंदे यांनी केलाय.
त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलाय.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84