दि.२१ जून २०२२
(चेकमेट टाईम्स): महाराष्ट्र
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत फूट पडल्याच्या
बातम्या येऊ लागल्या आहेत. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत.
दरम्यान त्यांच्या या भूमिकेनंतर गटनेते पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्यात आलं आहे.
त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार
आहेत. २०१९ मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी ४० हजार मताधिक्क्याने विजयी
झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता.
चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत.
अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून
पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय
घेतला आहे. शिवसेनेच्या गटनेतपदावरून शिंदे यांना
डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात
आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेनेने याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही. या
आधी गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अजय चौधरी हे
कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांच्याकडे
गटनेतेपदाची ही धुरा देण्यात आली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84