पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): दहावीचा
रिझल्ट लागला असून नव्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड
उडाली आहे. पुढील करिअरची दिशा ठरवणारे हे वर्ष असल्यानं ही परीक्षा महत्त्वाची
मानली जाते. या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या
महाविद्यालयात, त्यांच्या आवडीच्या कोर्सला प्रवेश मिळू शकतो.
पण, दहावीला साधारण मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची मोठी
संख्या असते. या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कामाची बातमी आहे.
दहावीमध्ये ४० ते ६० टक्के मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षण काय
घ्यावं हा मोठा प्रश्न असतो. विशेषत: हे विद्यार्थी ग्रामीण भागातील तसंच
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आणखी गंभीर बनतो. आपली
मुलं लवकरात-लवकर हाताशी यावं अशी या पालकांची अपेक्षा असते. या मुलांना रोजगार मिळवून देणारा एक चांगला कोर्स पुण्यात उपलब्ध आहे.
आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना
तातडीनं रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारनं Minimum Competency and Vocational Courses (MCVC) या कोर्सची निर्मिती केली आहे. पुण्यातील लक्ष्मणराव आपटे एमसीव्ही हा विभाग चांगलाच प्रसिद्ध आहे. आपटे प्रशालेत कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल टुरिझम आणि
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे तीन अभ्यासक्रम एमसीव्हीसीच्या माध्यमातून आज उपलब्ध
आहेत.
या विभागातील कोर्स सामान्य किंवा कमकुवत आर्थिक गटातील
विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून केले आहेत. त्यामुळे त्याची वार्षिक फी ही २४०० रूपये
इतकी असून साहित्य फी ११०० रूपये आहे. आपटे प्रशालेकडून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
देण्याचाही प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण सुरू असताना अनुभव
येण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी पाठवले जाते.
ट्रॅव्हल टुरिझम हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. केसरी टूर्स,
दिशा टुरिझम, गौरीशंकर टुरिझम या प्रसिद्ध
ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ते नोकरी करत आहेत. तर काही जणांनी स्वत:चा पर्यटन व्यवसाय
देखील सुरू केला असून त्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात
दमदार पाऊल टाकलंय.
कन्स्ट्रक्शन
टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या सरकारी ऑफिसमध्ये बांधकाम
क्षेत्रामध्ये त्यांची स्वतःची सेवा देत आहेत. तसेच वेगवेगळ्या बिल्डर्ससोबतही
त्यांना काम करता येते. हा कोर्स करून त्यांना वर्षाला 3 लाखापर्यंतचे
पॅकेज मिळू शकते.
या कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा असून अभ्यासक्रमाची
फी सुद्धा कमी आहे. या कोर्सची वार्षिक फी २४०० रूपये तर साहीत्य फी ११०० रूपये
आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यांना
शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्नही आपटे प्रशालेकडून केला जातो. तसेच शिक्षण सुरू
असताना त्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देखील मिळते.
दहावीला कमी मार्क मिळालेल्या आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या
विद्यार्थ्यांनी तसंच त्यांच्या पालकांनी नाराज होऊ नये. एमसीव्हीचा
हा अभ्यासक्रम तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ज्या
पालकांना या अभ्यासक्रमासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी ११ ते ५
या वेळामध्ये आपटे रोडवर हॉटेल श्रेयस शेजारी प्रत्यक्ष शाळेत येऊन या विभागाशी
संपर्क साधावा.
संपर्कासाठी फोन नंबर - 9198226 08476 (देशमुख सर, कार्याध्यक्ष)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84