पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळवणे विषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणाने लग्नाची मागणी घालून तिला नेदरलँडवरुन शगुन पाठविला. तो सोडवून घेण्याच्या नादात आयटी इंजिनिअर तरुणीला सायबर चोरट्यांनी ११ लाख १६ हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी
विमाननगरमध्ये राहणाऱ्या एका २९ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी पासून २४ जून २०२२ पर्यंत घडला. अधिक माहितीनुसार, फिर्यादी या आयटी इंजिनिअर आहेत. त्यांनी लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉमवर
नाव नोंदणी केली होती. त्यातून त्यांची नेदरलँड येथील एकाशी ओळख झाली. त्यानंतर
त्यांनी व्हॉटसॲप एसएमएस, व्हॉईस कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क साधला.
त्यातून तरुण हा नेदरलँड येथे असून लग्नासाठी तयार आहे, व शगुन पाठविले आहे, असे
सांगितले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांना कस्टम असे नाव असलेल्या मोबाईलवरुन
फोन आला. तुमचे पार्सल आले आहे. त्याची कस्टम ड्यूटी भरायची आहे, असे सांगून वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास
सुरुवात केली. फिर्यादी त्याला भुलून पैसे भरत गेल्या. तब्बल ११ लाख १६ हजार रुपये
भरल्यानंतरही पार्सल न मिळाल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर
त्यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे करीत
आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes