Type Here to Get Search Results !

जीएसटी विभागाची १३ कोटी रुपयांची फसवणूक ; पुण्यातील प्रसिद्ध व्यापाऱ्यास अटक

 




पुणेदि.१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): बनावट बिलांच्या आधारे वस्तू आणि सेवा कर विभागाची (जीएसटी) १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करणयात आली आहे.

या प्रकरणी शिव स्टील ट्रेडर्स कंपनीचे मालक दौलत शिवलाल चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत २७ व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. बनावट बिलांद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर विशेष मोहिम आखण्यात आली आहे. शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीच्या व्यवहारांबाबत जीएसटी कार्यालयातील विशेष पथकाला माहिती मिळाली होती. तपासणीत या कंपनीने कोणत्याही वस्तुची प्रत्यक्ष विक्री तसेच खरेदी केली नसल्याचे आढळून आले होते.

सखोल तपासणीत कंपनीने १३ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त ऋषीकेश अहिवळे, चंदर कांबळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे आदींनी कारवाई केली. चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करचुकवेगिरी प्रकरणात जीएसटी पुणे विभाग कार्यालयाकडून आतापर्यंत सहा व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.