पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने मोठ्या
प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याआधी जगातील अनेक मोठ्या
कंपन्याही आर्थिक मंदीचे कारण देत आपले कर्मचारी कमी करत आहेत. सत्या नडेला
संचालित मायक्रोसॉफ्ट ‘पुनर्रचना’चा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली टेक कंपनी बनली आहे.
यानंतर कंपनीने यावर स्पष्टीकरणही दिले आहे.
मिळालेल्या
माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट च्या कार्यालयात
आणि उत्पादन विभागातील १.८१ लाख कर्मचार्यांपैकी सुमारे १ टक्के, म्हणजेच सुमारे एक टक्के कर्मचार्यांना
कामावरून काढून टाकण्यात आले. या निर्णयामुळे १,८०० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
या घटनेला कंपनीच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.
या प्रकरणी कंपनीने निवेदनदेखील दिले आहे. ‘सर्व कंपन्यांप्रमाणे आम्ही नियमितपणे आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यांचे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार संरचनात्मक समायोजन करतो. येत्या वर्षभरात आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करत राहू आणि एकूण कर्मचारी संख्या वाढवू. अले आश्नासन मायक्रोसॉफ्टने दिले आहे. तसेच, मायक्रोसॉफ्टने विंडोज, टीम्स आणि ऑफिस ग्रुप्समधील नोकरभरतीही कमी केली असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84