पुणे, दि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पीएमआरडीएने महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ४३८ ओपन आणि अॅमेनिटी स्पेस नुकतेच कागदोपत्री महापालिकेला हस्तांतरीत केल्या आहेत. परंतू या जागा अतिक्रमण मुक्त तसेच सिमाभिंत घालून बंदीस्त करून द्याव्यात असे पीएमआरडीएला कळविले आहे.
महापालिकेमध्ये समावेश
होण्यापुर्वी ३४ गावांचा कारभार पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत होता. २०१८
मध्ये ११ गावे आणि दीड वर्षापुर्वी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
११ गावांचा विकास आराखडा महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून २३ गावांचा
विकास आराखडा पीएमआरडीए करत आहे. सप्टेंबरपर्यंत हा विकास आराखडा तयार होईल, असा
अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही गावे महापालिका हद्दीत आली असली तरी अद्याप
बांधकाम परवानगी पीएमआरडीएच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे. तसेच येथील शाळा,
दवाखाने व अन्य आस्थापना या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. समाविष्ट
गावांतील शाळा, दवाखाने व अन्य आस्थापना महापालिकेच्या
ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी पीएमआरडीएच्या हद्दीत असलेल्या अॅमेनिटी
स्पेस ओपन स्पेसेस महापालिकेच्या ताब्यात द्याव्यात यासाठी पाठपुरावा सुरू होता.
जेणेकरून या जागांवर नागरी सुविधा निर्माण करणे शक्य होणार आहे. नुकतेच
पीएमआरडीएने ४३८ ओपन आणि ऍमेनिटी स्पेस कागदोपत्री महापालिकेला सोपवल्या आहेत. या
जागांची सद्यस्थितीबाबत महापालिकेला कुठलिच माहिती देण्यात आलेली नाही.
महापालिका प्रशासनाने या जागा
ताब्यात घेण्यापुर्वी त्या अतिक्रमण मुक्त तसेच नियमानुसार त्या सिमाभिंत आणि गेट
लावून बंदीस्त केल्या आहेत का याची खातरजमा करून घेतली जाणार असल्याचे
पीएमआरडीएच्या अधिकार्यांना स्पष्ट केले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या मालमत्ता
व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याशी संपर्क साधला असता ते
म्हणाले, बांधकाम परवानगी देताना महापालिका ऍमेनिटी स्पेस व
ओपन स्पेस म्हणून मिळालेल्या जागा संबधित जागा मालकाकडून सिमाभिंत व गेट लावूनच
बंदिस्त करून ताब्यात घेते. पीएमआरडीएने नुकतीच ४३८ जागांची
कागदपत्रे सोपविली आहे. परंतु जागा ताब्यात घेताना जागा बंदिस्त करूनच
महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे पीएमआरडीएला कळविले आहे.
पीएमआरडीएने महापालिकेला सोपविलेल्या ४३८ अॅमेनिटी स्पेस पैकी ८ जागा या भाडेतत्वावर दिल्या आहेत. हे भाडेकरार गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापुर्वी केले आहेत किंवा नंतर याची माहिती महापालिका प्रशासन घेत आहे. ही माहिती आल्यानंतर भाडेकरार अथवा भाडे कोणी घ्यायचे याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राजेंद्र मुठे यांनी दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes