पुणे, दि.१८ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): रात्री उशिरा दारुच्या नशेत बस चालवून ती वारजे
पुलाखालील सिग्नलला धडकविली. त्यात सिग्नलचे आणि पीएमपीची पुढची काच फुटून नुकसान
झाले. याप्रकरणी वारजे पोलिसांनी पीएमपी बस चालक अनिल नामदेव केंजळे (वय ५०, रा. आनंद पार्क सोसायटी, वडगाव शेरी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर नेवसे यांनी वारजे पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे पुलाखाली बुधवारी रात्री ११ वाजता घडला. याबाबत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अनिल केंजळे हे नशेमध्ये पीएमपी बस घेऊन चालले होते. त्यांनी नशेत
वारजे पुलाखालील सिग्नलच्या खांबाला धडकून दुभाजकाला धडक दिली. त्यात सिग्नलचे
नुकसान झाले. बसची पुढील काच फुटली.
वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तेव्हा
पोलीस उपनिरीक्षक होळकर यांनी चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून
रुग्णालयात पाठविले. त्यात केंजळे नशेच्या अंमलाखाली असल्याचे दिसून आले. त्यामुळे
त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84