Type Here to Get Search Results !

नांदेड सिटी सर्कल जवळ नशेत असलेल्या कारचालकाने दोन दुचाकी स्वारांना उडवले

 


पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी सर्कल जवळ काल रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने दोन दुचाकी स्वारांना धडक दिल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये दोन दुचाकी स्वार जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योगेश पवार व विपील हळदकर अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेंद्र सिंग (रा.ललित, सी-405) हा कारचालक दारूच्या नशेत भरधाव वेगात कार चालवत होता. सोबत कारमध्ये त्याचा परिवार होता. नांदेड सिटी येथील सर्कल जवळ कार चालकाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये योगेश पवार व विपील हळदकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघातामध्ये दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान कारचालक अमेंद्र सिंग याला हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात आले आहे. हवेली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार रामदास बाबर यांनी दिली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.