Type Here to Get Search Results !

पुण्यात भरदिवसा हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या सराईत टोळक्याला अटक

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : पुणे येथे भरदिवसा तरूणाच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना ७ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयानजीक बसस्थानकात घडली. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी त्याच ठिकाणाहून मोबाइल हिसकावल्याची घटना घडली होती. त्यामुळे मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

याप्रकरणी श्रेयस चांडोळकर (वय २० रा. टिंगरेनगर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास श्रेयस हा जिल्हाधिकारी बसस्थानकाजवळ थांबला होता. यावेळी त्याने मित्राला फोन करण्यासाठी मोबाइल हातात घेतल्याची संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. बसची वाट पाहत थांबलेल्या तरूणाच्या हातातील २० हजारांचा मोबाइल हिसकावून नेल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली. मागील काही दिवसांपुर्वी चोरट्यांनी त्याच ठिकाणाहून मोबाइल हिसकाविल्याची घटना घडली होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.