Type Here to Get Search Results !

रहदारीच्या वेळी चारचाकी वाहनावर कोसळले वडाचे झाड.

 


दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पाऊस सुरू असताना ऐन रहदारीच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट जवळ एक मोठे वडाचे झाड चारचाकी वाहनावर कोसळल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून एका व्यावसायिकाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. मुख्य रस्त्यावर झाड आडवे पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास व्यावसायिक विकास दत्तात्रय दांगट हे आपल्या चारचाकी गाडीने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील त्यांच्या ऑफीसकडे चालले होते. नांदेड सिटी गेट जवळील वजन काट्यासमोर आल्यानंतर जोराचा आवाज झाला व भले मोठे जीर्ण झालेले वडाचे झाडा गाडीवर कोसळले. यात दांगट यांच्या चारचाकी गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे आजुबाजुला असणारे वाहन चालक व व्यावसायिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाच्या सोन्याबापू नागरे,शुभम माळी, श्रीकांत आढाव व किशोर काळभोर या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत झाड हटविण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. तर ही दुर्घटना टळली असती........ रस्त्याचे काम सुरू असल्याने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेने असलेली ही जीर्ण वडाची व इतर झाडे काढण्याची रितसर परवानगी घेतली होती मात्र 'काही' पर्यावरण प्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केल्याने हे काम झाले नाही. जर त्यावेळी काम झाले असते तर आज ही घटना घडली नसती. मागील वर्षीही रात्रीच्या सुमारास येथील वडाचे झाड रस्त्यावर कोसळून पूर्ण वाहतूक बंद झाली होती. सुदैवाने तेव्हाही कोणाला दुखापत झाली नव्हती. अद्यापही वेळ गेलेली नाही त्यामुळे प्रशासनाने ही जीर्ण झाडे वेळीच काढून घ्यावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत."ऑफीसमध्ये काम असल्याने चालक येण्याच्या अगोदर मी एकटाच गाडी घेऊन आलो होतो. पाऊस सुरु होता व वाहनांचीही गर्दी होती. काही कळण्याच्या आत भले मोठे झाड गाडीवर कोसळले. अजून एक फूट जरी गाडी पुढे गेली असती तरी अघटीत घडले असते." विकास दत्तात्रय दांगट, व्यावसायिक, नांदेड फाटा.

"जवळच चहाच्या टपरीजवळ आम्ही उभे होतो. अचानक गाडीवर झाड कोसळताना दिसले व आम्ही सर्वजण मदतीसाठी धावलो. काही दुचाकी चालकही थोडक्यात बचावले." अशोक भड, टेंपोचालक."माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. सुदैवाने कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळाली आहे." उदयसिंह शिंगाडे, पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड वाहतूक शाखा.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.