Type Here to Get Search Results !

महिला अधिकाऱ्याने BJP च्या माजी आमदाराला सुनावलं; म्हणाल्या, “औकात है तो नौकरी से निकालकर दिखा

 


पुणेदि.१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या आणि व्हिडीओ समोर येतात. अशा वादांमध्ये अनेकदा नेतेमंडळी अधिकाऱ्यांना फैलावर घेताना दिसून येतं. सामान्यपणे अनधिकृत बांधकांमाविरोधातील कारवाई किंवा आपल्या मतदारसंघामधील कारवाईच्या वेळी नेत्यांकडून आडकाठी आणण्याचे प्रकार घडताना पहायला मिळतात. यातूनही अनेकदा वादावादी होतो आणि कधीतरी अगदी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक महिला आयएएस अधिकाऱ्याने भाजपाच्या माजी आमदाराला झापताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या महिला जिल्हाधिकाऱ्याचं कौतुक केलंय.

झालं असं की, मध्य प्रदेशमधील बडनगर येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासंदर्भातील नियोजन करण्यासंदर्भात प्रशासनाचं काम सुरु होतं. येथील घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर एसडीएम असणाऱ्या निधी सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक येथील रस्त्याच्या बांधकामामध्ये सुधारणा करुन पाणी साचणार नाही यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी पोहोचले.

तयारी सुरु असतानाच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या निधी सिंह यांच्याबरोबरच भाजपाचे माजी आमदार शांतीलाल धबाई वाद घालू लागले. या कामाला शांतीलाल यांचा विरोध होता. त्यांनी निधी यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी निधी यांनी माजी आमदाराला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही शांतीलाल हे शांत झाले नाहीत. आपल्या समर्थकांसोबत या ठिकाणी पोहचलेल्या शांतीलाल यांनी थेट निधी यांना कामावरुन हटवण्याची धमकी दिली.


मी तुला नोकरीवरुन काढून टाकेन, अशी धमकी शांतीलाल यांनी निधी यांना दिली. कॅमेरासमोरच हा सारा प्रकार सुरु होता. सुरुवातीला शांतीलाल यांच्याकडे लक्ष न देणाऱ्या निधी यांनी अचानक संतापल्या. त्यांनी नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या शांतीलाल यांना थेट, “तू कौन होता है मुझसे मेरी नौकरी पर बोलने वाला, औकात है तो नौकरी से निकालकर दिखा, चल दफा हो यहां से”, असं म्हणत फटकारलं.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.