Type Here to Get Search Results !

पाच किलो सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या महिलेला अटक

 


पुणेदि.२३ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सराफी दुकानात सोने खरेदीसाठी जाऊन गाडीत ठेवलेले पैसे आणून देण्याच्या बहाण्याने ५ किलो सोन्याची बिस्किटे घेऊन एका महिलेने पोबारा केला. यात २ काेटी ६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत त्या महिलेला खारघर येथून बेड्या ठोकत ऐवज जप्त केला.

माधवी सूरज चव्हाण (वय ३२, रा. खारघर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोपटलाल गोल्डचे राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला ही मूळची खारघरची आहे. तिचे माहेर पुण्यातच असून, तिची बहीणदेखील पुण्यातच राहण्यास आहे. पुण्यातून सोने घेऊन ते पुढे जास्त किमतीला देण्याचे काम ती करत करत होती.

फिर्यादीशी गेल्या काही वर्षांपासून तिची ओळख आहे. माधवी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील पोपटलाल गोल्डच्या दुकानात आली. नेहमी किलो, अर्धा किलो अशा वजनाचे सोने ती खरेदी करत असे. बुधवारी तिने गर्भवती असल्याने वारंवार येण्यास जमणार नसल्याचे कारण देत तब्बल ५ किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. तिने काही रक्कम कॅश आणि काही रक्कम आरटीजीएस करणार असल्याचे सांगितले. सोन्याची बिस्किटे खरेदी केल्यानंतर गाडीत ठेवण्यात आलेली कॅश घेऊन येण्याच्या बहाण्याने ती दुकानाच्या बाहेर पडली. दुकानदाराने देखील तिच्यामागे एक व्यक्ती पाठविला; परंतु तिथे तिने कर्मचाऱ्याला हुलकावणी देऊन पोबारा केला. त्यानंतर तिने तिचा मोबाइल फोनदेखील बंद केला. याप्रकरणी रात्री उशिरा फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून तिचा माग काढला. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे तिचा माग काढला असता ती खारघर येथे पोहाेचल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.