Type Here to Get Search Results !

मुस्लिम महिलेच्या त्या त्रासाला कंटाळून पुण्यात तरुणाची आत्महत्या; महिलेला अटक



पुणेदि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महिलेकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाचा मृतदेह हडपसर येथील वैदुवाडी येथे कालव्यात सोमवारी आढळून आला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

नयन नरेंद्र मोरे (वय. २०, रा. हरकारनगर भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. जेबा सय्यद (वय.३०,रा. भवानीपेठ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नुतन बाहुले (वय.२६,रा. भवानी पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन व संबंधित महिला जवळच्या परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, शुक्रवारी (ता.२२) रात्री साडेबाराच्या सुमारास दोघांचे एकमेकांसोबत वाद झाले होते. त्यावेळी महिलेने नयन याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र काही वेळानंतर हा वाद मिटला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी नयन घरातून निघून गेला. रात्री उशीरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, सोमवारी हडपसर जवळील वैदूवाडी येथील कालव्यामध्ये तरुणाचा मृतदेह मिळून आला. त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक. पोलिस ठाण्यात आले, त्यांनी संबंधित महिलेविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार, तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत मानसिक छळ केला तसेच चिथावणी देऊन त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.