पुणे दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : नांदेड-शिवणेला जोडणाऱ्या पुलावरून मुठा नदीतील पाणी जोरात वाहत आहे. खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे नदीची पाणीपातळी वाढत आहे. काल पहाटे साडेचारच्या सुमारास शिवणेवरून नांदेडमध्ये जाणाऱ्या दोन युवकांपैकी एक युवक निखिल कौशिक हा वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर दुसरा युवक आशिष देविदास राठोड खांबाला पकडून जीव वाचवून उभा होता, त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. याबद्दलची माहिती उत्तम नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
सकाळी ६ च्या सुमारास शिवणे गावातील तरुण
विद्याधर दळवी,
महेश कांबळे, राज वाल्मिकी यांनी पोलिसांच्या
मदतीने खांबाला धरून असलेल्या तरुणाला दोराच्या सह्याने जीव धोक्यात टाकून मोठ्या
हिमतीने वाचवले आणि त्याला बाहेर काढले.
तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला उत्तमनगर
पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याची माहिती तरूणाने दिली. धरणातून पाणी सोडल्यापासून
पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे, हे दोघे
तरुण बॅरिगेट ओलांडून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली
काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84