Type Here to Get Search Results !

पीएमपीएमएलच्या कॅबला आम आदमी पार्टीचा विरोध

 


पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): पीएमपीएमएलचे उद्दिष्ट हे प्रवाशांसाठी दर्जेदार वाहतूक सेवा देणे आहे, परंतु पीएमपी च्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांची कायम गैरसोय होत असते. बससेवा सुरळीत करण्याऐवजी नवीन कॅब सेवेमुळे प्रवाशांचा कोणता फायदा होणार आहे? पीएमपीच्या कॅबमुळे वातुकीची कोंडी व प्रदूषण वाढणार आहे. म्हणूनच आम आदमी पार्टीचा पीएमपीच्या कॅब सेवेला कायम विरोध असेल, असे आपचे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.

पीएमपी बस बरोबर लवकरच पुण्याच्या रस्त्यावर पीएमपी कॅब ही धावणार आहेत. या नव्या योजनेनुसार पीएमपी १०० ते २०० कॅब खरेदी करणार आहे. बस प्रमाणे पीएमपीएलच्या माध्यमातून कॅब सेवाही सुरु करण्यात येणार आहे. ओला, उबेरच्या धरतीवर पीएमपीएल कॅब ऑनलाईन बुक करता येईल व त्याचे पेमेंट ही ऑनलाईन पद्धतीनेच द्यावे लागेल.

पीएमपीएल च्या या नव्या योजनेला प्रवासी संघटनेचा विरोध आहे, बस मधून ५० प्रवासी प्रवास करतात तर कॅब मधून फक्त ५ प्रवाशी प्रवास करू शकतात. ५० प्रवाशांना कॅब मधून प्रवास करायचा असेल तर १० कॅब लागती. सध्या पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या फार गंभीर बनली आहे. त्यामध्ये या नवीन कॅबची भर पडल्यावर वाहतूक कोंडी वाढणार आहे. एक बस, दहा कॅब हे समीकरण गृहीत धरल्यास, या कॅबमुळे वाहतूक कोंडी बरोबर प्रदूषणातही वाढ होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरात एकूण ६५ लाखाहून जास्त वाहने आहेत, त्यात या कॅब ची भर पडल्यावर सुविधेपेक्षा वाहतूककोंडी आणि प्रदूषण या समस्या वाढतील व आरोग्याच्या समस्याही उद्भवतील.

आप पुणे सार्वजनिक वाहतूक समन्वय समितीचे चेंथिल अय्यर यांनी पीएमपी हा खाजगी टॅक्सी व्यवसाय होवु शकत नाही. विश्वासार्ह, प्रभावी, कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश आहे, ज्यात पीएमपी सपशेल अपयशी ठरली असताना कॅब सेवेतून ते भ्रष्टाचाराचे नवीन मार्ग शोधत आहेत असे दिसते.पीएमपीच्या ताफ्यात एकूण २०३६ बसेस आहेत. या पैकी अनेक बस नादुरुस्त आहेत, कॅबच्या  योजने ऐवजी नादुरुस्त बसची दुरस्ती झाली व सर्वच बस रस्त्यावर धावल्या, तर प्रवासी वाहतूक सेवा नक्कीच सुरळीत होईल.

आप वाहतूक विंग महाराष्ट्रचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य पीएमपी च्या कॅब सेवेबाबत म्हणाले  ही प्रस्तावित कॅब सेवा म्हणजे पीएमपीच्या तुघलकी कारभाराचे उत्तम उदाहरण आहे, या कॅब मुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ येईल. ओला, उबेरला पूर्वीपासून विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांवर पीएमपीची कॅब ही मोठा अन्याय ठरेल. 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.