दि. 02 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): विधानसभा
अध्यक्ष निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी
उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी
यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राजन साळवी यांनी बंडखोर
आमदारांना इशारा दिला आहे. शिवसेनेच्या
व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते राजन साळवी म्हणाले आहे. महाविकास आघाडीतर्फे विधानसभा
अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की महाविकास
आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी
आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर
आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर
त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे राजन
साळवी म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी प्रत्येकजण व्हीप काढेल. विधीमंडळ नियमावली नुसार व्हीप काढला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी दिली. एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा दीपक केसरकर यांनी इशारा दिला होता. याला सुनील प्रभू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर केसरकर यांनी बोलायची गरज नाही. शिवसेनेकडून अध्यक्षपद निवडणुकीसाठी राजन साळवींनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत होणार हे नक्की झाले आहे. राजन साळवी यांचा अर्ज भरताना अशोक चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84