पुणे, दि.२१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून वारजे
भागातील दोन नामांकित सोसायट्यांमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर
निष्कासन कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४ हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे
करण्यात आले.
सदरील अनधिकृत
बांधकाम हटविणे संदर्भात बांधकाम विकास विभागाकडून संबधितांना नोटीसा बजावण्यात
आल्या होत्या. मात्र त्या नोटिशीकडे सारासार दुर्लक्ष्य करून ही बांधकामे संबंधित
मालकांकडून हटवण्यात आली नव्हती. त्यामुळे बांधकाम विकास विभाग झोन 3 चे कार्यकारी
अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या
मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, सचिन जावळकर
यांच्या पथकाने पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पोलीस बंदोबस्तात, पालिकेचे बिगारी, २ ब्रेकर, २
गॅस कटर, २ जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली. तर
भविष्यात या कारवाई आणखीन तीव्र करण्याचा इशारा देखील पुन्हा एकदा देण्यात आला
आहे.
यातील तिरुपती
नगर या मान्यताप्राप्त बांधकाम प्रकल्पात सोसायटी मध्ये विनापरवाना बांधण्यात
आलेले सोसायटीचे अनधिकृत कार्यालय पाडण्यात आले. सोसायटीच्या सदस्यांमध्ये
पडलेल्या दोन गटांमध्ये परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या. यानंतर पुणे
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने ‘शुभांकरम’ इमारतीखाली
बांधलेले कार्यालय निष्कासित केले.
तर ज्ञानेश
सोसायटी मध्ये देखील दोन बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ज्ञानेश सोसायटी मधील चार बांधकामांपैकी दोन ठिकाणच्या
बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यात बहुमजली स्वरूपात सुरु असलेल्या या बांधकामांच्या पहिल्या
मजल्यावरील स्लॅब’ला एक-एक छिद्र पाडून, भिंती पाडण्यात आल्या.
त्याचबरोबर
सोसायटी मध्ये सुरु असलेल्या इतर दोन बांधकामांकडे दुर्लक्ष्य करून, पालिकेने
कोरोना नंतर नागरिकांचे आर्थिक स्त्रोत आटले आहेत. त्यातच कष्टाच्या पैशातून एक एक
रुपया जमवत करत असलेल्या बांधकामांवर कशाला उगाच कारवाई करायची अशीही माणुसकीची
भावना दाखवल्याने, त्या इतर दोन बांधकाम धारकांनी सुटकेचा
निश्वास सोडला. त्यांच्यावर “त्या” भगवंताची
विशेष कृपादृष्टी असावी आणि म्हणूनच कारवाई झाली नसावी अशाही चर्चा परिसरात सुरु
होत्या. एकूणच पालिकेने सर्वच अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत अशीच सौजन्याची भूमिका
ठेवावी अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84