पुणे, दि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती विक्री करण्याचे प्रमाण मोठे
आहे. पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे
पर्यावरणास हानी पोहचत आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे.
एकीकडे मूर्तीवर बंदी घातली असली तरी दुसरीकडे पीओपीच्या मूर्ती तयार केल्या जात
आहेत. या काळात मूर्ती विकणारे व्यावसायिक त्यांची बुकिंग करण्याच्या तयारीला
लागले आहेत. या वर्षी पीओपीच्या मूर्तींना बंदी असल्याने महापालिकेने पीओपी मुर्ती
विरघळण्यासाठी अमोनिअम बायोकार्बोनेट नागरिकांना मोफत वाटप केले जाते. पण यंदा
याची खरेदी केली जाणार नाही असे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पण
विक्रेत्यांवरील कारवाईबाबत संभ्रम आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण
महामंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या
गणेशमुर्तींवर बंदी घातली आहे. पण यावर कारवाई कशी करावी यावर स्पष्टता नसल्याने
महापालिकाच गोंधळात पडली आहे. पीओपीवरील मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानावर कारवाई
कोण करणार याबाबत स्पष्टता नाही. घनकचरा विभाग कारवाई करणार की अतिक्रमण विभाग
करणार हे अद्याप ठरलेले नाही. या दोन्ही विभागात पीओपी बंदीवर बैठक झाली, पण
कारवाईचे धोरण ठरलेले नाही. त्यामुळे महापालिकेने प्रदूषण महामंडळाला पत्र लिहून
कारवाई कशी करायची याबद्दल मार्गदर्शन मागितले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84