पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं सातत्यानी मनोरंजन करते आहे. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत.
मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या
झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका
दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका
साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही
दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.
विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख
प्रेक्षकांना आवडतो आहे.
कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे
राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं
चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते
आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं
ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा
ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची
प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या
दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या
भूमिकांत दिसणार आहेत.
विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन
चुरसदार भांडण बघण्यासाठी १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका नक्की बघा.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes