पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): नदीपात्रातील रस्त्याबरोबरच मोकळ्या
जागांवर ढोल पथकांचा सराव सुरू झाला असतानाच ढोल-ताशा पथकांकडून स्वारगेट
परिसरातील नेहरू स्टेडियममध्ये सुरु असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या सरावात आवाजाची
मर्यादा पाळली जात नसल्याबाबत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी
संघटनेकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या पथकाने सरावासाठी
मैदानाच्या परिसरात अनधिकृत शेड उभारले असून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याबाबत मैदान परिसरात असलेल्या
विविध खेळांच्या कार्यालयांकडून आक्षेप घेण्यात आला होता.
पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आणि कबड्डी संघटनेच्या
कार्यालयाचे कामकाज रात्रीपर्यंत सुरू असते. या कालावधीत नागरिकांची कार्यालयात ये
जा सुरू असते. ढोल-ताशा पथकाचा सराव या कालावधीत सुरू असल्याने पार्किंगसह अन्य
अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. स्वच्छतागृहाच्या दरवाज्यात पथकाकडून अनधिकृत शेड
उभारण्यात आले आहे. ढोल-ताशाच्या आवाजामुळे कार्यालयात कामकाज करण्यास अडथळे येत
आहेत, असे या दोन संघटनांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद
केले आहे.
नेहरू स्टेडियममधील कबड्डी मैदानाच्या बाजूला
असलेल्या मोकळ्या जागेत जिल्हा क्रिकेट, कबड्डी खेळाची
कार्यालये आहेत. तसेच अण्णा भाऊ साठे वाचनालयही आहे. या संघटनांची कार्यालये सकाळ
आणि संध्याकाळ सुरू असतात. या जागेवर पूर्वी रोप वेचे खांब उभारण्याचा प्रयत्न
करण्यात आला होता. मात्र त्याविरोधात उच्च न्यायालयाने केवळ खेळासाठी आणि आतील
जागा क्रिकेटसाठी वापरण्यात यावी, असा आदेश दिला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84