Type Here to Get Search Results !

"मुलाखत देणारे, घेणारे आणि छापणारे सगळेच घरचे..." मनसेचा त्या मुलाखतीवर टोला

 


पुणेदि.२७ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत हास्यास्पद असल्याचं वक्तव्य पुण्यातील मनसे कडून करण्यात आलंय. मनसे चे प्रवक्ते आणि सरचिटणीस हेमंत संभूस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती नंतर प्रतिक्रिया दिली आहे.

संभूस म्हणालेत, "मुलाखत देणारे, मुलाखत घेणारे आणि मुलाखत छापणारे सगळेच घरचे आहेत. शिवसेना ही कौटुंबिक संघटना आहे की पक्ष आहे? शिवसेनेनं आता हिंदुत्वाबाबत बोलू नये. शिवसेननं हिंदुत्व सोडलेलं आहे. मी या मुलाखतीचा हाच सारांश काढलेला आहे 'न झेपलेलं हिंदुत्व'.

मध्यंतरी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनीही मनसे म्हणजे अगरबत्ती असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना संभूस म्हणाले, " आम्हाला अगरबत्ती म्हणून हिणवण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावं. भगिनी आहात म्हणून फार बोलत नाही. पण त्यांनी लक्षात ठेवावं की अगरबत्ती जर बॉम्बला लागली तर बॉम्ब फुटतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं."

एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "माझा मनसे सैनिक मला सर्वात प्रथम आहे. संघटना वाढीसाठी जर एखादी गोष्ट पोषक ठरत असेल तर ते आमच्यासाठी चांगलंच आहे." असं जर होणार असेल तर कुठल्याही मनसैनिकाची नाराजी असेल असं मला वाटत नसल्याचंही यावेळी संभूस म्हणालेत."गृहमंत्री पद मिळणार असेल तर शिंदे - फडणवीस यांच्या सोबत जाण्याबद्दल विचार करू..." असं अमित ठाकरे बोलल्याच्या अफवा काही दिवस आधी पसरल्या होत्या. त्यावर बोलताना संभूस यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.

"मुळात हिंदुत्व खायचा पदार्थ नव्हे. हिंदुत्व एक विचार आहे. एक संस्कृती आहे. ज्याला ती झेपते त्यानेच ते स्वीकारावं. आम्ही हिंदुत्ववादी बोलून होत नाही. तर ते प्रकर्षाने दाखवावं लागतं, लोकांमध्ये रुजवावं लागतं." असंही हेमंत संभूस यांनी सडेतोडपणे सांगितलं.''

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.