पुणे, दि.२१ जुलै २०२२ (चेकमेट
टाईम्स): रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना
रुग्णवाहिकेला रस्ता करून देणं ही सर्वांचीच जबाबदारी असते. अनेकदा रुग्ण अत्यवस्थ
असतात. त्यामुळे चालकांना रुग्णवाहिका वेगाने चालवावी लागते. मात्र वेगामुळे
अनेकदा अपघातांची शक्यता निर्माण होते. दुर्दैवाने कर्नाटकमध्ये रुग्णांना घेऊन
जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
बयंदूरजवळील
टोलनाक्यावर एक वेगवान रुग्णवाहिका धडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
आहे. या व्हिडीओमध्ये रुग्णवाहिका येतेय हे दिसताच टोलनाक्यावरील कर्मचारी
बॅरिकेडस दूर करण्यासाठी धावतात. त्याचवेळी वेगाने येणारी रुग्णवाहिका टोलनाक्यावर
येऊन धडकते. या जोरदार धडकेत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह चार जण ठार झाल्याचं
सांगण्यात येत आहे.
अपघातग्रस्त
रुग्णवाहिका रुग्णाला होन्नावरा येथे घेऊन जात होती. रुग्णवाहिका टोलनाक्यावर आली
असताना तिथं गाय बसलेली होती. गाय असल्यामुळे चालकाने वेगवान रुग्णवाहिका
थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कदाचित रुग्णवाहिकेने टोलनाक्याला धडक
दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84