Type Here to Get Search Results !

एका गुन्ह्याचा तपास करताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ह्रदयविकाराचा झटका; उपचारापूर्वीच झाला मृत्यू

 


पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): चोरीच्या तपासासाठी सोलापूरला गेल्यानंतर पुन्हा माघारी येत असताना प्रवासादरम्यान खडक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा (एएसआय) हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दलासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोडवे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट उपस्थित होते. भास्कर माणिक मोडवे (नेमणूक खडक पोलीस ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

एएसआय भास्कर मोडवे आणि पोलिस शिपाई सुनील वालकोळी 26 जुलैला चोरीच्या तपासासाठी सोलापूरला गेले होते. त्यानंतर पुण्यात माघारी येत असताना प्रवासादरम्यान मोडवे यांना छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शिपाई वालकोळी यांनी मोडवे यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोडवे हे कुटुंबीयांसह स्वारगेट पोलीस लाईनमध्ये राहायला होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.