दि. 04 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): आज विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले. बांगर यांच्यासह आणखी एक आमदार श्यामसुंदर शिंदे विश्वासदर्शक ठरावापूर्वीच एकनाथ शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा आकडा ४१ झाला आहे. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या
बंडानंतर शिवसेनेचे ३९ आमदार शिंदे गटात सामील झाले. पण संतोष बांगर ठाकरेंसोबत
एकनिष्ठ राहिले होते. त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात भूमिका घेतली होती. पण आज
बहुमत चाचणीआधी त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले. ते आज
शिंदे गटासोबत विधानभवनात दाखल झाले. शिवसेनेशी ज्यांनी बेइमानी केली त्या
आमदारांवर त्यांच्या बायकादेखील विश्वास ठेवणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य संतोष बांगर यांनी केले होते. उद्धव ठाकरेंसोबत ते
एकनिष्ठ राहिल्याने त्यांचा हिंगोली जिल्ह्यात सत्कारदेखील करण्यात आला होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84