दि. 04
जुलै २०२२
(चेकमेट टाईम्स):प्रेमासाठी कोण काय करू शकतं याबाबद्दल कोणीच
काही सांगू शकत नाही.आजवर आपण प्रेमासाठी समुद्रातून पोहत आलेले बघितले आहे तर कधी
कोणाचा जीव घेतलेला ही बघितला आहे. प्रेमासाठी
काय पण.. असं म्हणत आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला खुष ठेवायला अनेक लोक विविध
गोष्टी करायला तयार असतात. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी खरीखुरी कहाणी सांगणार
आहोत ज्यात एका तरुणीने तिच्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी चक्क लिंग बदलले… चला तर पाहुयात ही अजब गजब प्रेमकहाणी!
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये दोन मैत्रिणी
मैत्रीच्या पलीकडे पोहोचल्या होत्या. त्यांना लक्षात आलं होतं की आता त्या
एकमेकींच्या प्रेमात आहेत आणि पुढचे आयुष्य त्यांना एकमेकींच्या सहवासात घालावायचे
आहे. मात्र घरी सांगितल्यावर घरचे संपूर्ण विराधात गेले. बदलणारा समाज,आधुनिकतेकडे वळणारी आजची पिढी यांसारख्या अनेक गोष्टींपासून
कदाचित ते दहा हात लांब असावेत.त्यात प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळापर्यंत अद्याप
हे विचार पोहोचलेही नसावेत.
आपल्या जोडीदाराच्या प्रेमात वेडे झालेल्या या
महिलेने समाजातील कोणतेही अडथळे टाळण्यासाठी आणि इतर लोकांचा हस्तक्षेप
थांबवण्यासाठी तिचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. प्रयागराज येथील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयातील
डॉक्टरांच्या पथकाने हे ऑपरेशन हाती घेतले. त्या डॉक्टरांच्या टीमने तिच्या
शरीराच्या वरच्या भागांमध्ये आणि छातीची पुनर्रचना करताना लिंग बदलाची
शस्त्रक्रिया देखील केली. एवढंच
नाही तर तिच्या छातीवर टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सचे काही इंजेक्शन दिले आहेत
ज्यामुळे तिच्या छातीवर काही काळाने केस देखील उगवण्यास सुरवात होईल.
आज प्रयागराजमधील या जोडप्याने याच
समाजमान्यतेच्या नियमांमुळे आज लिंगबदलाचे पाऊल उचलले. तर याच तथाकथित रुढींपुढे न
झुकता आधुनिक, प्रगत
आणि स्वतंत्र भारताच्या दिशेने पाऊल टाकूयात!
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84