Type Here to Get Search Results !

ते दोघे शिवसेना सोडून गेल्याने या माजी खासदारांची घरवापसी; बांधले शिवबंधन

 


पुणेदि.२१ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेला धक्का बसलाय. शिवसेनेला हिंगोली जिल्ह्यात आक्रमक चेहरा उरला नाही, असं म्हटलं जातंय. पण एकेकाळी शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. सुभाष वानखेडेंनी पुन्हा खांद्यावर भगवा घेतलाय. हेमंत पाटलांची जागा वानखेडे यांनी भरून काढलीय, असे म्हटले जात आहे. संतोष बांगरला टक्कर देणारा मराठा चेहरा छावा दलाचे नेते विनायक भिसे यांचाही वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतलाय. यामुळे शिवसेनेत पडलेली फूट भरुन निघणार आहे. विनायक भिसे हा मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत आहे, मराठा आरक्षणासाठी विनायक भिसे यांनी फार मोठी आंदोलन उभारली होती. विनायक भिसे यांना संतोष बांगर प्रमाणेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघे ही एकमेकांचे जुने राजकीय शत्रू आहेत.

सुभाष वानखेडे हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघातील एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांचा आक्रमकपणा बघून बाळासाहेबांनी त्यांना हदगाव मतदार संघातून उमेदवारी दिली होती. हदगाव मतदार संघातून सुभाष वानखेडे निवडून आले होते. सुभाष वानखेडे सलग तीनदा आमदार तर एकवेळ खासदार होते. हिंगोली जिल्ह्यात खासदार पाटील आणि आमदार बांगर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने नव्याने बांधणी सुरू केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटिलांचा पराभव करून वानखेडे हिंगोलीतून खासदार झाले होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या राजीव सातव यांचा तिथे विजय झाला. हा माझा पराभव शिवसेनेतील दोन आमदारांमुळे झाला, असा आरोप करून सुभाष वानखेडे शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला होता. त्यानंतर ते भाजपात गेले. २०१९ ला आयत्यावेळी भाजपला सोडचिठ्ठी देत वानखेडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर हिंगोली लोकसभेतून निवडणूक लढविली होती. पण शिवसेनेचा गद्दार म्हणून शिवसैनिकांनी २० दिवसांपूर्वी आलेल्या नांदेड येथील हेमंत पाटलांना मोठ्या फरकाने निवडून दिले.

आता हेमंत पाटील आणि संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे हा ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेत दाखल झालाय. येत्या काळात आणखी मोठे नेते शिवसेनेत येणार असल्याचे बोलले जात आहे. यात संतोष बांगर यांच्याकडून विधानसभेला पराभूत झालेले अजित मगरही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण आयत्या वेळी उद्धव ठाकरे साहेबांना बळ देण्यासाठी आलेले हे रोखठोक आणि आक्रमक नेते मूळ शिवसैनिकांना किती रुचतात? वानखेडे जुन्या निष्ठावान शिवसैनिकांचे मन वळवून घेण्यात किती यशस्वी होतात? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.