पुणे
दि.१४ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : एका महिलेचा
पाठलाग करत, वाईट इशारे करत तसेच महिलेच्या घरात
घुसण्याचा प्रय़त्न करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार भोसरीतील धावडे वस्ती येथे
घडला. जून २०२२ ते ११ जुलै २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित २७ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी नितीन संजय गुडदे
(वय २६, रा. दिघी रोड, भोसरी) या
आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी
गुडदे हा जून २०२१ पासून फिर्यादी यांचा पाटलाग करत आहेत. फिर्यादी यांच्याशी
जवळीक साधण्याचा प्रयत्न करून वाईट इशारे करत होता. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला
समजावून सांगितले. मात्र. त्याने ऐकले नाही. त्यानंतर ११ जुलै २०२२ रोजी आरोपी
फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वाईट
इशारे केले, फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा
प्रयत्न केला. तसेच जर तू मला भेटली नाहीस, माझेशी मैत्री
ठेवली नाहीस तर मी तुझी बदनामी करेल, मी तुला सोडणार नाही,
अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84